शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीची हळद म्हणूनच जीआय मानांकन द्या : इंडियन पेटंट कार्यालयाकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 20:30 IST

भारतातील ८० टक्के हळदीचा व्यापार सांगलीमधून होतो. देशातील दरही येथील बाजार समितीतील दरावरच अवलंबून असतो. केशरी रंग, पेवातील साठवणूक ही येथील हळदीची खास वैशिष्ट्ये असल्यामुळे

ठळक मुद्दे२६ जूनला मुंबईत सुनावणी

सांगली : भारतातील ८० टक्के हळदीचा व्यापार सांगलीमधून होतो. देशातील दरही येथील बाजार समितीतील दरावरच अवलंबून असतो. केशरी रंग, पेवातील साठवणूक ही येथील हळदीची खास वैशिष्ट्ये असल्यामुळे सांगलीची हळद म्हणूनच भौगोलिक मानांकन (जिआॅग्राफिकल इंडेक्स : जी.आय.) मिळावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी मुंबईच्या इंडियन पेटंट कार्यालयाकडे केली आहे. यावर दि. २६ जून रोजी सुनावणी होणार आहे.वर्धा जिल्'ातील वायगाव हे गाव ८० टक्के हळदीचे उत्पादन घेत आहे. त्या हळदीत करक्युमिन तेलाचे प्रमाण ६ ते ८ टक्के आहे. याच हळदीने आता इतर वाणांच्या हळदीला मागे टाकून जीआय मानांकन मिळविले आहे. तेथील वैशिष्ट्यांवर ते मिळाले आहे. त्याला सांगलीच्या शेतकºयांचा विरोध नाही. तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार त्यांना ते मिळाले आहे. मात्र सांगलीच्या हळदीत वायगाव हळदीपेक्षा वेगळी वैशिष्ट्ये असल्यामुळे ‘सांगलीची हळद’ म्हणूनच मानांकन मिळाले पाहिजे, अशी जिल्'ातील शेतकºयांची मागणी आहे. पुण्यातील ‘जीआय' विषयातील अभ्यासक प्रा. गणेश हिंगमिरे यांनी काही शेतकºयांच्यावतीने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. सांगलीच्या मागणीवर मुंबई येथील इंडियन पेटंट कार्यालयात दि. २६ जूनरोजी सुनावणी होणार आहे.प्रा. हिंगमिरे म्हणाले की, सांगली ही देशातीलच नव्हे, तर जगातील हळदीची प्रमुख बाजारपेठ आहे. या परिसरात पिकली जाणारी दर्जेदार राजापुरी हळद, हळदीचा दर्जा वर्षानुवर्षे टिकवून ठेवणारी जमिनीखालची पेवांची व्यवस्था, पेवांतील हळदीची आकडेआकडी (बिल टू बिल) खरेदी-विक्री, सांगलीचा हळद वायदेबाजार, बँकांकडून हळदीचे पॉलिश आणि पावडर यांसाठी मिळणारे अर्थसाहाय्य, त्या परिसरात उभारलेल्या हळद पावडर आणि पॉलिश मिल्स-वेअरहाऊस-गोदामे, वाहतूक कंपन्या, अडते, खरेदीदार आणि हमीदार व्यवस्था आदी घटक, सांगली हे देशभरातले हळद केंद्र बनण्यास महत्त्वपूर्ण ठरले. कोरडे व उष्ण हवामानामुळे हळदीचा नैसर्गिक रंग केशरी, चव थोडीशी कडवट, तिखट आहे.या वैशिष्ट्यांवरच सांगलीची हळद म्हणूनच जीआय मानांकन मिळावे, यासाठी प्रयत्न चालू आहेत. दि. २६ जून रोजी मुंबई येथील इंडियन पेटंट कार्यालयात सुनावणी होणार असून, निश्चित मानांकन मिळणार, असा आम्हाला विश्वास आहे. वायगाव हळदीला जीआय तेथील वैशिष्ट्यांवर मिळाले आहे. त्यामुळे सांगलीच्या हळदीला मानांकन मिळण्यात अडचण नाही, असाही विश्वास हिंगमिरे यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Sangliसांगलीbusinessव्यवसाय